Date: 2 May 2020
➖➖➖➖➖➖➖➖➖
*_सांज आभाळ वेंधळी..!_*
➖〰️〰️〰️〰️〰️〰️〰️➖
सांज आभाळ वेंधळी
गेली झाकोळ टाकून,
दिले उसाशांचे ओझे
सये सांभाळ झाकून!
देतो अस्तित्वाला ठेंगा
सूर्य बुडताना डोही,
सांज खुडते पाकळ्या
गंध सांडून निर्मोही!
लाल पोपटी रोपटी
भोगी वैशाखाचा डंख,
यावा थंड शिडकावा
सांज गारव्याचा पंख!
सांज धरून बोटाला
पाही लुचण्यास काही
थेंब निरक्षीर थोडा
येथे ओघळत नाही!
सांज आभाळ साळून
गेली खोडून क्षितिज,
सये उरातच दाब-
तुझी कोसळती वीज!
*©शशी त्रिभुवन, अस्तगाव(अहमदनगर)*
*चलभाष:8275032897*
➖〰️〰️〰️〰️〰️〰️〰️➖
➖➖➖➖➖➖➖➖➖
*_सांज आभाळ वेंधळी..!_*
➖〰️〰️〰️〰️〰️〰️〰️➖
सांज आभाळ वेंधळी
गेली झाकोळ टाकून,
दिले उसाशांचे ओझे
सये सांभाळ झाकून!
देतो अस्तित्वाला ठेंगा
सूर्य बुडताना डोही,
सांज खुडते पाकळ्या
गंध सांडून निर्मोही!
लाल पोपटी रोपटी
भोगी वैशाखाचा डंख,
यावा थंड शिडकावा
सांज गारव्याचा पंख!
सांज धरून बोटाला
पाही लुचण्यास काही
थेंब निरक्षीर थोडा
येथे ओघळत नाही!
सांज आभाळ साळून
गेली खोडून क्षितिज,
सये उरातच दाब-
तुझी कोसळती वीज!
*©शशी त्रिभुवन, अस्तगाव(अहमदनगर)*
*चलभाष:8275032897*
➖〰️〰️〰️〰️〰️〰️〰️➖