Date: 2 May 2020
➖➖➖➖➖➖➖➖➖
*_पाखरा..!_*
➖〰️〰️〰️〰️〰️〰️〰️➖
दिशा शोध
उत्तराची
कडा भेद
पत्थराची!
घामातून
घे भरून
मोतियाचे
शुभ्र ऊन!
लाव लळा
फांदीलाच,
थंडी सोस
मस्त नाच!
चोचीतून
चोहीकडे
शिंपड तू
गंध सडे!
घे भरारी
सांगू कसे;
पंखांनाच
छंद असे!
पाखरा तू
रहा मुक्त,
स्वातंत्र्याचे
गात सूक्त!
*©शशी त्रिभुवन, अस्तगाव(अहमदनगर)*
*चलभाष:8275032897*
➖〰️〰️〰️〰️〰️〰️〰️➖
➖➖➖➖➖➖➖➖➖
*_पाखरा..!_*
➖〰️〰️〰️〰️〰️〰️〰️➖
दिशा शोध
उत्तराची
कडा भेद
पत्थराची!
घामातून
घे भरून
मोतियाचे
शुभ्र ऊन!
लाव लळा
फांदीलाच,
थंडी सोस
मस्त नाच!
चोचीतून
चोहीकडे
शिंपड तू
गंध सडे!
घे भरारी
सांगू कसे;
पंखांनाच
छंद असे!
पाखरा तू
रहा मुक्त,
स्वातंत्र्याचे
गात सूक्त!
*©शशी त्रिभुवन, अस्तगाव(अहमदनगर)*
*चलभाष:8275032897*
➖〰️〰️〰️〰️〰️〰️〰️➖
No comments:
Post a Comment