[10/03, 9:47 pm] शशी त्रिभुवन: *जाणारांना जर असेलच घाई; खुशाल कापून घ्यावे दोर, सोबत असता शब्दांची- का आपण जीवाला लावतो घोर?*@ *शशी त्रिभुवन*
[10/03, 11:26 pm] शशी त्रिभुवन: *शब्द होऊनि रात्र सावळी, गुंफितो कविता कवी निशाचर! जरतारीची त्याची झोळी, जागतो तो झोपे चराचर!@ शशी त्रिभुवन*
[11/03, 10:06 pm] शशी त्रिभुवन: *चारोळी*
★★★★★★★
स्वप्न असते एक,
सत्य होते एक,
जगत असता रंगत जायचे,
घेणार का रिटेक?
@ *शशी त्रिभुवन*
★★★★★★★★★
[11/03, 10:19 pm] शशी त्रिभुवन: *चारोळी*
=============
तिचं प्रेम मिटलं नाही,
प्रेम करूनही पटलं नाही,
असं कोणी वेडं होऊन,
खरंखुरं भेटलं नाही!
तहान होऊन चातकाची,
ती खरेच महान झाली;
उसासत राहिली आसवे,
तिच्यासाठी गहाण झाली!
© *शशी त्रिभुवन*
********************
[12/03, 3:12 pm] शशी त्रिभुवन: 〰〰〰〰〰〰
आयुष्य रंगीबेरंगी,
तरी भावना बेरकी होते!
कोपऱ्यात काळजाच्या,
आठवण गिरकी घेते!
〰〰〰〰〰〰
©शशी त्रिभुवन
[12/03, 3:27 pm] शशी त्रिभुवन: 〰〰〰〰〰〰
आठवणींचे पक्षी तिच्या
अंगणात तळ ठोकून;
होळी काय नि पंचमी,
तिच्यासोबत झोकून!
〰〰〰〰〰〰
©शशी त्रिभुवन
[12/03, 9:15 pm] शशी त्रिभुवन: 〰〰〰〰〰〰〰
*चारोळी*
*********************
तिच्या प्रेमात रंग नाही,
असे कसे म्हणता येईल?
तीच माझे जीवन आहे,
पाण्याशिवाय पोहता येईल?
© *शशी त्रिभुवन*
*********************
[12/03, 10:12 pm] शशी त्रिभुवन: 🔸🔻🔹🔻🔸🔹🔻🔸
*आपण सारे शब्दपुजारी*
*करतो उधळण शब्दांची!*
*होळी असेल आपली ऐसी*
*शब्दांची मोहक रांगोळी!*
© *शशी त्रिभुवन*
〰〰〰〰〰〰〰〰〰
[13/03, 10:23 am] शशी त्रिभुवन: का गुंतलास कुंतलात असा
लाडीक बटा बदलतील छटा!
रंग हवेतर हवे असे की,
उजळून जावे हृदय सदा!
@ शशी त्रिभुवन
[13/03, 1:42 pm] शशी त्रिभुवन: ****************
पहा धरेचे रंग सुंदर
शामसमई रंगीत अंबर
तैसे व्हावे जीवन आपले
आनंदी सुखमय निरंतर
©शशी त्रिभुवन
*******************
[14/03, 6:42 am] शशी त्रिभुवन: *तळातून ढवळूनही*
*नितळ आहे माझे मन!*
*तुझ्या तुझ्याच आठवणीत*
*जगतो आहे प्रत्येक क्षण!*
@ *शशी त्रिभुवन, अस्तगाव*
[14/03, 7:57 am] शशी त्रिभुवन: ====================
*आठवणींची स्वप्नचूड*
*रात्रभर जळत राहिली,*
*जळती स्वप्ने जागी होऊन*
*तिच्या विरहाने छळत राहिली!*
© *शशी त्रिभुवन, अस्तगाव*
====================
[14/03, 2:08 pm] शशी त्रिभुवन: 〰〰〰〰〰〰〰〰〰***************************
कट्टयावरची शांतता भर दुपारी
चिडीचूप सर्वजण कसे साहू?
एकटेपणाच्या उन्हात मी
दोस्तहो कुठले गीत गाऊ?
@ *शशी त्रिभुवन*
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[14/03, 2:18 pm] शशी त्रिभुवन: **********************
*ऊन सोबत घेऊन*
*आम्ही राबतो रानावनात,*
*शब्दफुले सखे आमचे*
*गुणगुणने पाना-कानात!*
@ *शशी त्रिभुवन*
**********************
[14/03, 2:25 pm] शशी त्रिभुवन: दुःख त्यांचे मांडताना
मुकी होते हो लेखणी,
जरी वंशज तुकोबाचे
आम्ही काबडाचे धनी!
@शशी त्रिभुवन
[14/03, 2:44 pm] शशी त्रिभुवन: ****************************
*मी म्हणालो दुःख येथे*
*ते त्वरेने धावलेही,*
*वेदनेचे घाव त्यांना*
*अतरंगी भावलेही;*
*देखलेल्या रक्ताचा केला*
*जरी उपचार त्यांनी,*
*फुंकरली झुळूक आणि*
*शोधला बाजार त्यांनी!*
@ *शशी त्रिभुवन*
****************************
[14/03, 9:39 pm] शशी त्रिभुवन: कुणी शब्दात गुंतलेला,
कुठे शब्दसाथी पोरके,
सांगताना खूप काही
मौन असते बोलके!
@शशी त्रिभुवन, अस्तगाव
[14/03, 10:23 pm] +91 77750 02275: रंग;फिके पडतात, उडतात,
दाखवतातही रंगण्यापुरते
रंगांची कोष्टकं कशी भरावी?
शुभ्र नितळ थोडेच उरते
@ शशी त्रिभुवन
[14/03, 11:12 pm] शशी त्रिभुवन: कुणी आपल्या आठवणीतून जुना होतो
कुणी आपल्या जखमातून उणा होतो,
टोचलेल्या भल्यांची खोडावी रेषा
नाहीतर पारधी जागा पुन्हा होतो
@ शशी त्रिभुवन, अस्तगाव
[14/03, 11:19 pm] शशी त्रिभुवन: मी म्हणालो बोल काही;
बोलली ती बरेच बाई,
मौन होते ते परंतु
जे शब्दात झरलेच नाही!
@ शशी त्रिभुवन, अस्तगाव
[15/03, 6:41 am] शशी त्रिभुवन: तिने चंद्र कोरला ओठी,
अन् मौन धरले ओठी!
तरी चांदणवेल छबेली
पसरवी हजारो गोष्टी!
©शशी त्रिभुवन, अस्तगाव
[15/03, 7:10 am] शशी त्रिभुवन: तिने चंद्र कोरला ओठी,
अन् मौन धरले पोटी!
तरी चांदणवेल छबेली
पसरवी हजारो गोष्टी!
©शशी त्रिभुवन, अस्तगाव
[15/03, 10:20 pm] शशी त्रिभुवन: जी वचनफुले सोबतीने
जगत आलो साथ-साथ
त्या फुलांचा गंधकोश
दारवाळलेला अंतरात!
@शशी त्रिभुवन
*सुंदरच!*
[15/03, 10:28 pm] शशी त्रिभुवन: आठवणींच्या हिंदोळ्यावर
बसलेले थर थर पाय,
हितगुज की मेतकूट
डोळ्यांवर दुधी साय!
@शशी त्रिभुवन
[15/03, 10:38 pm] शशी त्रिभुवन: ====================
*कुणी शब्दापाठी पळतो,*
*कुणी शब्दालाही छळतो,*
*लेखणीत मिसळूनी पारा*
*कुणी उगा उभा तळमळतो!*
@ *शशी त्रिभुवन,अस्तगाव*
=====================
[16/03, 6:09 am] शशी त्रिभुवन: झोपेने दिधला नकार,
जरी चंद्र क्षितिजापाशी!
एकांती छळते मजला
प्रिये याद तुझी जराशी!
@शशी त्रिभुवन, अस्तगाव
[16/03, 11:30 pm] शशी त्रिभुवन: भरलेल्या जखमांना
पुनः पुन्हा सोलू नये,
जपलेल्या प्रेमावर
उघड फार बोलू नये
@ शशी त्रिभुवन
[17/03, 5:57 pm] शशी त्रिभुवन: रेंगाळत गळा पडते ऊन,
सावलीच्या शोधात मी
धावपळीच्या अवखळ दारी
कोलाहलाची काय कमी?
@शशी त्रिभुवन, अस्तगाव
[17/03, 6:44 pm] शशी त्रिभुवन: मी स्वप्नांचे बांधून पाय,
जरा बुडविले रंगामध्ये!
हसली वेडी झाली रंगीत,
नाचली आपल्याच ढंगामध्ये!
©शशी त्रिभुवन, अस्तगाव
[17/03, 10:43 pm] शशी त्रिभुवन: =======================
*दोन असतात नावे त्यांचा*
*एक जेव्हा भाव होतो,*
*सप्तपदी चालून जातात*
*त्यास विवाह नाव देतो!*
*सहज असते सहजीवन*
*त्यात तृप्ती बहरलेली,*
*संसारवेल दिसामाजी*
*आनंदाने मोहरलेली!*
=======================
*उज्ज्वलाजी आपणास विवाहाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!*
@शशी त्रिभुवन
[17/03, 11:16 pm] शशी त्रिभुवन: चोरून का न् दुरून का
हळूच मनात शिरून ना!
भरुन काय न् झरझरून का
प्रेमाचे घट्ट धागे धरून ना!
@शशी त्रिभुवन
[18/03, 8:44 pm] शशी त्रिभुवन: वेदनांना भोगताना
सखा होतो कान्हा,
मोरपीस आठवांचे
मी जरा शोधताना!
@शशी त्रिभुवन, अस्तगाव
*कविता सुंदर शब्दशिल्प!*
[18/03, 9:48 pm] शशी त्रिभुवन: *हायकू*साठी मी जरा दुरावलेच,
*जान्हवी*च्या कौतुकाने बरीच भारावले
*चारोळी* असले तरी मीही आहेच भारी,
आवाज द्या फक्त उभीच आहे दारी!
@शशी त्रिभुवन
[19/03, 12:23 am] शशी त्रिभुवन: मनातून सांडतोही
भावनांचा ओला गंध!
ओसंडत्या आसवांना
न घातला मी बंध!
@ शशी त्रिभुवन
[19/03, 12:40 am] शशी त्रिभुवन: शब्दोत्सव चारोळ्यांचा
अजूनही झडतो आहे,
पाऊस जसा पागोळ्यांतून
गर्जुनी हा पडतो आहे
@ शशी त्रिभुवन
[19/03, 12:47 am] शशी त्रिभुवन: पिंपळपान आठवणींचे
जपून ठेवत कप्पाबंद
शब्दांना सोबत घेतले
त्यांचाच लावत छंद!
@ शशी त्रिभुवन
[19/03, 12:52 am] शशी त्रिभुवन: स्वप्न अजून तरुण आहे
जरी रात्र सरून गेली,
शब्दफुले गुंफताना
माझी ओंजळ भरून गेली!
@शशी त्रिभुवन
[19/03, 12:57 am] शशी त्रिभुवन: आस असो आभास असो,
पानांचा रंग खास असो,
वास असो मधुवास असो
शब्दांचा अधिवास असो!
@शशी त्रिभुवन
[19/03, 12:16 pm] शशी त्रिभुवन: चटपटीत असते काही
ते शब्द उचलून घेतात,
पटवणारे भेटले की
पटलेले दूर होतात
@शशी त्रिभुवन
[19/03, 12:21 pm] शशी त्रिभुवन: शब्दांना शब्द जोडत
रंगतेही जुगलबंदी,
कोवळ्या कळ्यांनो
नका होऊ जायबंदी!
@शशी त्रिभुवन
[19/03, 10:41 pm] शशी त्रिभुवन: काळजावर हात ठेवून
पेपर लिहावा मस्त
डोक्यामध्ये असतेच
शब्दात व्हावे व्यस्त
@शशी त्रिभुवन
[20/03, 11:22 am] शशी त्रिभुवन: =========================
★★ *चारोळी* ★★
मी चिमणीचे जपतो घर,*
*तिची चिवचिव लाडिकवाणी,*
*अंगणातून ती जाता दूर*
*डोळ्यात माझ्या येते पाणी!*
© *शशी त्रिभुवन,अस्तगाव*
=========================
[20/03, 1:57 pm] शशी त्रिभुवन: भर दुपार टळटळीत ऊन
एक चिमणी चिवचिवते,
घरटे माझे हरवलेय कुठे
काळजात दुःख साठवते
@शशी त्रिभुवन
[20/03, 10:13 pm] शशी त्रिभुवन: *सुख म्हणाले दुःखाला खुपले कारे?*
*दुःख म्हणाले सुखाला पटले प्यारे!*
*सोबतच तर असतो आपण,*
*तर मग का दोघांसाठी वेगळे उतारे!*
© *शशी त्रिभुवन,अस्तगाव*
[21/03, 10:25 pm] शशी त्रिभुवन: भाव हवा काळजात ठाव हवा,
शब्द जोडताना मुक्त त्याला वाव हवा
मनी वसावा अंतरी अलगद बसावा
शब्दाने द्यावा नेहमीच अर्थ नवा!
@शशी त्रिभुवन
[21/03, 10:42 pm] शशी त्रिभुवन: ☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
अर्थ रुसल्यावर सर्वच होते काजळीचे धुके,
काय बोलावे आता मौनही झाले मुके,
कोलहलाचे हलाहल पचवून पाहिले मी-
परंतु काळीजही खल्लास मुर्दाडा इतुके!
© *शशी त्रिभुवन,अस्तगाव*
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
[21/03, 10:51 pm] शशी त्रिभुवन: 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*काळजात घाव ज्याचे*
*का पुसावे नाव त्याचे*
*सोबतीची पाऊले जर*
*न दिसावे गाव त्याचे!*
© *शशी त्रिभुवन, अस्तगाव*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
[21/03, 11:25 pm] शशी त्रिभुवन: मुक्तीच्या गाथेला
हवेची नवलाई
पाय ज्यांचे जमिनीवर
त्यांना नसते भय काही
@शशी त्रिभुवन,अस्तगाव
[21/03, 11:29 pm] शशी त्रिभुवन: नयनी माझ्या आसवांचा
का वाहत आहे पूर
पुरासोबत आठवणींनी
नेले बहुतेक दूर!
[21/03, 11:50 pm] शशी त्रिभुवन: थोडी दुरुस्ती करतोय
👇👇👇👇👇
का जागे केले कोणी
हृदय माझे आठवणींनी
मी उगाच झालो भोजा
*ती खेळामधली राणी!*
@ *शशी त्रिभुवन,अस्तगाव*
[22/03, 10:29 pm] शशी त्रिभुवन: मुलीच्या विरहाची
शब्दात न होय गाथा,
परक्या घरी परंतु
जाळी जिवास चिंता!
©शशी त्रिभुवन,अस्तगाव
[22/03, 10:30 pm] शशी त्रिभुवन: *शब्दांकुर साहित्य प्रेमी मंच*
♥♣♥♣♥♣♥♣♥♣
*आजचा उपक्रम* *स्पर्धेसाठी*
💞💞💞💞💞💞💞💞💞💞
॥ *दुहेरी चारोळी स्पर्धा* ॥
दिनांक - २२ मार्च २०१७.
💞💞💞💞💞💞💞💞💞
विषय : *डोळ्यातली आसवे* (दुःख भाव)
*हृदयातली स्पंदने* (प्रेमभाव)
******************************
वेदनेचा सूर राधा,प्रेमपावा श्रीहरीं
आत्मानंद शोधताना होते जरा निलाजरी,
आसवे डोळ्यांतुनी ओघळताना पाहिली,
आठवांची दीर्घ वेणा; पोळताना काहिली
------------------------------------------------
प्रेम म्हणजे भोग ना; वा वासनेचा डंख ते,
हृदयातील स्पंदनांना दे अलौकिक पंख ते,
दोन घडीचा डाव वा ना पाण्यावरची नाव ते,
मंजुळ किणकिण नाद अन मंदिरातील भाव ते!
------------------------------------------------
© *शशी त्रिभुवन,अस्तगाव(अहमदनगर)*
******************************
⚜💫⚜💫⚜💫⚜💫⚜
[23/03, 1:44 pm] शशी त्रिभुवन: दुपारच्या उन्हात
झाडाची सावली
नकोत चटके-
पायात धावली
@शशी त्रिभुवन
[23/03, 1:48 pm] शशी त्रिभुवन: *चिमणीच्या डोळ्यात*
*मिटलेले ऊन,*
*वाराही थांबलाय*
*सोबत म्हणून!*
@ *शशी त्रिभुवन, अस्तगाव*
[23/03, 2:27 pm] शशी त्रिभुवन: *सैराट होते मनही*
*मृगजळाला येथे बघून*
*हिरवाईतच रमून जावे*
*हिरवाईत गावी धून*
© *शशी त्रिभुवन,अस्तगाव*
★★★★★★★■★★★★★★★
[23/03, 2:41 pm] शशी त्रिभुवन: भरून आलंय आभाळ बघ,
ओथंबून थांबलेत ढग...!
वास्तवात जग वेड्या; वर पहा
मोबाईलच्या स्वप्नातून जागे व्हा!
@शशी त्रिभुवन
[23/03, 3:24 pm] शशी त्रिभुवन: *डोईवर हंडा; हंड्यात पाणी,*
*चिमण्या पोरी अनवाणी,*
*डोंगरकडा पेरीत फुफाटा*
*त्यांची ऐकत असतो कहाणी!*
© *शशी त्रिभुवन,अस्तगाव*
======++++++++++++========
[23/03, 9:20 pm] शशी त्रिभुवन: कुणासाठी आसवं तर
कुणासाठी फसवं असतं,
प्रेम कळतं प्रेमळाला
मनातून हासवं असतं
©शशी त्रिभुवन,अस्तगाव
[23/03, 10:48 pm] शशी त्रिभुवन: सत्त्यात भेटते जे
शब्दात मांडतो मी,
वसते मनात जेही
त्यास काव्यरूप देई
@शशी त्रिभुवन,अस्तगाव
[23/03, 10:54 pm] शशी त्रिभुवन: ती असते जरा उशाशी
सोबत तिची असोशी....
....जरा वेळावता ही मान-
झाले का मीही नकोशी?
@शशी त्रिभुवन
[23/03, 11:00 pm] शशी त्रिभुवन: कुणी ठोकरलेला मीही
जगण्याचा आस्तिक झालो!
जे जहर मिळाले मजला,
मी आनंदाने प्यालो!
©शशी त्रिभुवन, अस्तगाव
[24/03, 6:12 am] शशी त्रिभुवन: ******************************
पहाटेस स्वप्न पडले
फूल झाले कळीचे,
गुज कानी ऐकूनि
मुग्ध भाव उमलले!
©शशी त्रिभुवन,अस्तगाव
******************************
[24/03, 6:22 am] शशी त्रिभुवन: मन होई भोवरा
अंतरात वेदना
झाला कुठे गुन्हा तरी
जागवी संवेदना!
©शशी त्रिभुवन,अस्तगाव
[24/03, 6:43 am] शशी त्रिभुवन: सूर्याभोवती कोंडाळे अन्
स्वप्ने शोधती धुमारे,
वास्तवाच्या विस्तवातून
जीवनाचे गीत गा रे!
©शशी त्रिभुवन,अस्तगाव
[24/03, 7:07 am] शशी त्रिभुवन: ☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
स्वप्न जेव्हा कैद झाले
मिठीत होता मोगरा,
धुंदावले प्रीतडोळे
स्वर जरासा घोगरा!
© *शशी त्रिभुवन,अस्तगाव*
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
[24/03, 6:43 pm] शशी त्रिभुवन: शब्दांनीच खुलतो आपण
शब्दांसाठी रुसतोही
शब्द होऊनि मुके मुके
निःशब्द हसतोही!
©शशी त्रिभुवन
[24/03, 6:49 pm] शशी त्रिभुवन: का मनाला भास आहे
तुझे गुणगुणनेही खास आहे,
अबोल जरी हा भाव सखे ग
अबोलीचा त्या येतो सुवास आहे
@शशी त्रिभुवन
[24/03, 6:56 pm] शशी त्रिभुवन: शब्द फसवे होतात जेव्हा
मनात घालतात धिंगाणा,
त्यांचे रुसवे निघतात जेव्हा
तेच घालतात पिंगा ना!?
©शशी त्रिभुवन,अस्तगाव
[24/03, 6:59 pm] शशी त्रिभुवन: *का शब्दांना छळतो आहे,*
*शब्दांवाचून जळतो आहे?*
*शब्दसख्या रे साथ तयांची*
*त्यांच्यातूनच कळतो आहे!*
*©शशी त्रिभुवन, अस्तगाव*
[24/03, 7:05 pm] शशी त्रिभुवन: मी शब्दांशी भांडत नाही,
स्नेहाधार मी तोडत नाही
शब्दे शब्दे माणुसकी मी
शब्दांनेच जोडत राही!
©शशी त्रिभुवन,अस्तगाव
[24/03, 7:24 pm] शशी त्रिभुवन: किती गुंतलो शब्दात आपण
केली शब्दरांगोळी छान
शब्दच्छल नका म्हणू हो
सजला रांगोळी कट्टा छान
@शशी त्रिभुवन
[24/03, 10:27 pm] शशी त्रिभुवन: श्वासमधले मिटत नसते अंतर
तू त्याच्यासह हवीच आहे निरंतर,
ना निर्जीव भासे आसमंत सखे ग
ताऱ्यांसोबत फुलत असते अंबर!
© *शशी त्रिभुवन,अस्तगाव*
★☆★☆★☆★☆★☆★☆★
[24/03, 10:59 pm] शशी त्रिभुवन: ☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
ज्या श्वासाची सोबत घेऊन
आकाशाला भिडतो आपण,
त्याला विसरून जातो होतो
श्वासालाही परके आपण!
*©शशी त्रिभुवन,अस्तगाव*
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
[24/03, 11:10 pm] शशी त्रिभुवन: ☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
*जे शोधतात चांदणे*
*त्यांना हेच सांगणे*
*कौतुकाच्या सोहळ्यात*
*जागवा जरा मने!*
*©शशी त्रिभुवन,अस्तगाव*
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
[24/03, 11:26 pm] शशी त्रिभुवन: ☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
*मी बंधनात ना दिशांच्या कधीही*
*मी मोजला वा माझा भाव नाही*
*जिच्याशी बांधून आहे प्रेमधागे*
*कवितेच्या गावात ना भरते रागे!*
*©शशी त्रिभुवन,अस्तगाव*
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
[25/03, 6:16 am] शशी त्रिभुवन: ☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
*प्रत्येक पहाट जागवते*
*केशरी स्वप्न मनामध्ये*
*मंद स्वर बासरीचे*
*बोलत ऐकत राधे राधे!*
*©शशी त्रिभुवन,अस्तगाव*
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
[25/03, 9:17 am] शशी त्रिभुवन: ☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
*ज्यांना कळत नाही*
*तेच पुढे पळतात*
*वादात पुढारी*
*दुसऱ्यांना छळतात!*
*©शशी त्रिभुवन,अस्तगाव*
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
[25/03, 11:53 am] शशी त्रिभुवन: 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*ऊन कोंडी माझा श्वास शोधू कुठे मी गारवा,*
*हिरवळीसाठी झाला इथे व्याकुळ पारवा*
*जपू चला झाडवेली पाण्यासाठी आसुसली,*
*फाटलेल्या ठिगळात पृथ्वीमाय बसलेली*
*©शशी त्रिभुवन,अस्तगाव*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
[25/03, 2:15 pm] शशी त्रिभुवन: सगळेच शांत
घरट्यात बंद
*चारोळी* झाली
कशी हो संथ?
@शशी
[25/03, 2:31 pm] शशी त्रिभुवन: मन आतुर होते
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*दुःख म्हणता सलते काही,*
*सुख शुभ्र कापूर होते,*
*डाग खपली आतील काळे*
*झटकण्या मन आतुर होते*
*©शशी त्रिभुवन,अस्तगाव*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
[25/03, 3:26 pm] शशी त्रिभुवन: एकांतात एकटेपण भोगत
वेडी बाभळी बांधावर,
काटेच का नशिबात-
टोचत आहेत जीवनभर
©शशी त्रिभुवन,अस्तगाव
[25/03, 7:38 pm] शशी त्रिभुवन: 🌧🌧🌧🌧🌧🌧🌧🌧🌧🌧🌧
*मी असण्याला पाऊस तारण,*
*मी नसण्याला पाऊस कारण,*
*मी भिजण्याला पाऊस हा प्रण,*
*मी झिजण्याला पाऊस हा क्षण!*
*©शशी त्रिभुवन,अस्तगाव*
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
[25/03, 8:53 pm] शशी त्रिभुवन: 💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫
*मी जपतो मनात माझ्या*
*तुझ्या आठवणींचे बाड,*
*अन् नकळत होतो हळवा*
*त्या छळतात भारी द्वाड!*
*©शशी त्रिभुवन,अस्तगाव*
💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫
[25/03, 9:19 pm] शशी त्रिभुवन: 🌧🌧🌧🌧🌧🌧🌧🌧🌧🌧🌧
*किती भिजलो जपला पाऊस*
*सरीवर सरी झेलत गेलो,*
*जपत राहिलो आपला पाऊस*
*त्याचं आभाळ पेलत गेलो*
*©शशी त्रिभुवन,अस्तगाव*
🌨🌨🌨🌨🌨🌨🌨🌨🌨🌨🌨
[25/03, 10:01 pm] शशी त्रिभुवन: इकडून हाय,
तिकडून बाय
हाकलून दिले
खरे की काय!
👇
फक्त विनोद.
@शशी
[25/03, 10:23 pm] शशी त्रिभुवन: ती भेटते जराही
विरही जीवास गारवा,
बोलते असे की
घायाळ मन पारवा!
@शशी
[25/03, 11:14 pm] शशी त्रिभुवन: कुणा एकांताचा सोस,
कुणी शब्दांवाचून ओस
रात्रीस जागुनि वेडा
करी दुःखाने अफ़सोस
@शशी त्रिभुवन,अस्तगाव
[25/03, 11:25 pm] शशी त्रिभुवन: =================
शब्दसुमने काव्याची
मी सोबत घेऊन जगतो
चिंता मज मग कसली
मी चंद्रसखा रे बघतो!
*©शशी त्रिभुवन,अस्तगाव*
===================
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
[26/03, 1:20 pm] शशी त्रिभुवन: ★★★★★★★
*हरलेल्याला*
*जहर देऊन*
*मारले जयांनी,*
*कहर असा की*
*पुण्यवान तेच*
*मानले तयांनी*
*©शशी त्रिभुवन*
★★★★★★★★
[26/03, 1:32 pm] शशी त्रिभुवन: *तिचं बाईपण, आईपण, गाईपण*
*क्षणात संपवतो एक कसाई गण,*
*जन्माआधीच तिच्या अस्तित्वाला*
*मानत आली संस्कृती परकं धन!*
*©शशी त्रिभुवन,अस्तगाव*
[26/03, 8:39 pm] शशी त्रिभुवन: ती सोबत असते कायम
अन हळूच करते खोडी!
ती सुचतच राहते; वाहते
अन कविता उरते थोडी!
@शशी त्रिभुवन
[26/03, 10:11 pm] शशी त्रिभुवन: ☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
*तुझ्या हसण्याने मोहित रात्र*
*पुनव चांदणे आले भरास*
*तुझी कंकणे किणकिणली*
*चांद्रखड्यांची पडली रास!*
*©शशी त्रिभुवन,अस्तगाव*
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
💫💫💫⭐🌙⭐💫💫
[26/03, 10:16 pm] शशी त्रिभुवन: ☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
*तू वेचले गुलाब काही*
*मी सुगंधाचा दिवाना*
*मोर होऊनि चोरपावली*
*तुला शोधणे एक बहाणा!*
*©शशी त्रिभुवन,अस्तगाव*
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
💫💫💫⭐🌙⭐💫💫
[26/03, 10:29 pm] शशी त्रिभुवन: ☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
*मी दुःखाचे भांडवल माझ्या*
*अन दुःखाचे कारण सुद्धा*
*मलाच माझे हीनवत जगतो*
*अज्ञानाने मरण वृथा!*
*©शशी त्रिभुवन,अस्तगाव*
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
💫💫💫⭐🌙⭐💫💫
[26/03, 11:11 pm] शशी त्रिभुवन: ☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
*तुझ्या असण्यातून वजा*
*तो श्वास मोजला बाई*
*प्राजक्त उमलला पुढती*
*मी भास समजलो काही*
*©शशी त्रिभुवन,अस्तगाव*
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
💫💫💫⭐🌙⭐💫💫
[26/03, 11:25 pm] शशी त्रिभुवन: ☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
*तुझ्या माझ्यातील द्वंद्व*
*सखे सनातन युद्ध*
*तुझे आक्रमण हळुवार*
*मी विसरतो तलवार*
*©शशी त्रिभुवन,अस्तगाव*
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
💫💫💫⭐🌙⭐💫💫
[26/03, 11:32 pm] शशी त्रिभुवन: तुझ्या आठवणीने होतो वेडापिसा
तू विसरलीस तर जीव जाईल माझा,
घुटमळतो सतत मी तुझ्यासभोती
तुझ्यावरून ओवाळला जीव माझा
[26/03, 11:37 pm] शशी त्रिभुवन: ☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
*मी वेडावतो,धुंदावतो*
*तुझ्या साथीत बावरतो*
*झेपावतो करून जवळीक,*
*नको; नव्याने सावरतो*
*©शशी त्रिभुवन,अस्तगाव*
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
💫💫💫⭐🌙⭐💫💫
[27/03, 9:14 am] शशी त्रिभुवन: ☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
*चालत्या पायासवे स्वप्ने चालू लागली*
*उघडले डोळे नव्याने सत्य बोलू लागली*
*वेदना वेडावली,सुख भ्रमात शोधले ,*
*माणसांची गाणी माझी पुन्हा नव्याने जागली*
*©शशी त्रिभुवन,अस्तगाव*
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
💫💫💫⭐🌙⭐💫💫
[27/03, 10:20 am] शशी त्रिभुवन: ☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
*का डोळ्यांना रात्र प्यारी*
*आसवांशी त्यांची यारी*
*प्रीत जुळवते एक क्षणी ,*
*अन् विरहाची पुन्हा तयारी!*
*©शशी त्रिभुवन,अस्तगाव*
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
[27/03, 8:20 pm] शशी त्रिभुवन: एकटेपणाचे फायदे जपत आलो,
माझ्याच सावलीत लपत आलो;
तिची भेट झाली अलवार वळणावर,
तिच्यासाठी रोज मी खपत आलो.
@शशी त्रिभुवन,अस्तगाव
[27/03, 8:25 pm] शशी त्रिभुवन: ☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
*ती सोबत असते ना*
*चंद्र नको पाहू असा*
*तो बुडालेला स्वप्नात*
*तुही नको राहू तसा!*
*©शशी त्रिभुवन,अस्तगाव*
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
[27/03, 8:31 pm] शशी त्रिभुवन: ☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
*मीच तुझा चंद्र आणि*
*तू खरी ग तारका!*
*सोबतीच्या चांदण्याला*
*का म्हणतेस परका?*
*©शशी त्रिभुवन,अस्तगाव*
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
[28/03, 1:31 pm] शशी त्रिभुवन: ☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
*अभासात जगताना*
*भास वाटती खरे!*
*मृगजळाच्या ओढीने*
*भुर्र उडाली पाखरे*
*©शशी त्रिभुवन,अस्तगाव*
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
[28/03, 2:50 pm] शशी त्रिभुवन: 🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀
फुलांना देऊन प्रेम माया
कडक उन्हात छाया व्हावी,
थंडगार पाण्याची धार जरा
तहानलेल्या मुखात द्यावी!
@शशी त्रिभुवन
🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀
[28/03, 5:11 pm] शशी त्रिभुवन: 🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
*किती उन्हाची तप्त काहिली,*
*झुळकेची मी वाट पाहिली,*
*यावेस तू आज अचानक*
*मनास माझ्या ओढ राहिली!*
*©शशी त्रिभुवन,अस्तगाव*
🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
[28/03, 8:31 pm] शशी त्रिभुवन: सुख म्हणजे गुलाब थोडे
दुःख टोचणारे काटे
सुखासाठी धावणारे
नको म्हणतात असले वाटे!
@शशी त्रिभुवन,अस्तगाव
[28/03, 11:24 pm] शशी त्रिभुवन: *साहित्य काव्यगंध आयोजित आठोळी स्पर्धेसाठी*
💗💗💗💗💗💗💗
*प्रेम* म्हणजे वंचना ना;
दोन जीवांचे सूर ते,
जिवंत ज्यांच्या जाणिवा
त्या हृदयीचे काहूर ते!
💞💞💞💞💞💞💞
प्रेम केले;नाही गुन्हा
दूर तरीही लोटले,
*विरह* नको म्हणताना
काळीज पुरे फाटले!
*©शशी त्रिभुवन,अस्तगाव*
💗💗💗💗💗💗💗
[29/03, 8:24 am] शशी त्रिभुवन: 💫⭐💫⭐💫⭐💫⭐💫
*पहाटेचे स्वप्न खरे*
*प्राजक्तात पाहावे,*
*होऊन दवबिंदू जरा*
*वसंतात भिजावे!*
*©शशी त्रिभुवन,अस्तगाव*
💫⭐💫⭐💫⭐💫⭐💫
[29/03, 8:31 am] शशी त्रिभुवन: ☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
*मी झोपेच्या रंगमहाली*
*तोच उगवली पहाट गाली*
*रंग गुलाबी घेऊन आली*
*सोनकिरणे सान कोवळी!*
*©शशी त्रिभुवन,अस्तगाव*
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
[29/03, 2:42 pm] शशी त्रिभुवन: ☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
*जो भोगतो उन्हाचा जाळ*
*नशिबी त्याच्याच लिहिला छळ*
*कापूस, तूर, पिक कोणतेही*
*देत नाही त्याला लढण्याचे बळ!*
*©शशी त्रिभुवन,अस्तगाव*
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
[29/03, 5:06 pm] शशी त्रिभुवन: ✨✨✨✨✨✨✨✨✨
*मी जपून आहे अजून*
*आठवणींचे आर्त सोहळे!*
*तुझ्या जाण्याने विस्कटले*
*पाणावले अलगद डोळे!*
*©शशी त्रिभुवन,अस्तगाव*
✨✨✨✨✨✨✨✨✨
[29/03, 5:22 pm] शशी त्रिभुवन: ✨✨✨✨✨✨✨✨
*हास्याची तुझी मोहक चाहुल,*
*प्रीतसखी ग अडते पाऊल,*
*जासी चंचले लगबगीने तू*
*मनास माझ्या देऊन भूल!*
*©शशी त्रिभुवन,अस्तगाव*
✨✨✨✨✨✨✨✨
[29/03, 7:23 pm] शशी त्रिभुवन: ✨✨✨✨✨✨✨✨
*कातरवेळी हुरहूरणारी,*
*आस जीवाला लावू नये,*
*अलवार जपले मनात जे*
*फुल पणाला लावू नये!*
*©शशी त्रिभुवन,अस्तगाव*
✨✨✨✨✨✨✨✨
[29/03, 10:54 pm] शशी त्रिभुवन: माझा नामघोष काव्यपंढरीचा,
नामटिळा लागो शब्दसुमनाचा,
मुखी एक नाम काव्यसरिता
करितो गजर साहित्याचा!
©शशी त्रिभुवन,अस्तगाव
[29/03, 11:07 pm] शशी त्रिभुवन: ☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
*कसा रे सोबत घेतोस,*
*वाऱ्यावरचे उनाड क्षण?*
*धडधड ऐकून घेत*
*स्थिरावते का वेडे मन!*
*©शशी त्रिभुवन,अस्तगाव*
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
[30/03, 5:56 am] शशी त्रिभुवन: ☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
*नभी उगवली चंद्रकोर,*
*तुझा विरह साहू कशी?*
*प्रीतफुले किती सडा तयांचा*
*चांदण्यात मी जाऊ कशी!*
*©शशी त्रिभुवन,अस्तगाव*
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
[30/03, 6:14 am] शशी त्रिभुवन: ☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
*बळी जाऊनि कळी फुलाला*
*जन्म देतसे नीट पहा!*
*आई भोगते प्रसववेदना*
*नाव पित्याचे रीत पहा!*
*©शशी त्रिभुवन,अस्तगाव*
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
[30/03, 10:12 am] शशी त्रिभुवन: *शारदा मालपाणी* यांच्या वाढदिवसा निमित्त *साहित्य काव्यगंध* व्दारा आयोजित काव्यस्पर्धा ( सुधाकरी )
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
*~स्पर्धेसाठी~*
---------------
*प्रथम क्रमांक प्राप्त माझी रचना*
*************************
*विषय--निराकार रुप*
****************************
*निराकार शोध*
****************************
तुला भेटावया
शोधली गा काशी
आत्मज उपाशी
घरीदारी.....:१:
तुझ्या भेटीसाठी
शीणविली काया
व्यर्थ सारे वाया
भावाविना...:२:
शोधली समाधी
शोधिल्या मी मूर्ती
देवा तुझी स्फूर्ती
नामजप.....:३:
त्रिगुणाचे रूप
शोधले त्रिखंडी
होऊनि पाखंडी
भवताली....:४:
तुझा शोध चित्ती
मिटूनिया डोळे
हात भाव भोळे
जोडोनिया...:५:
निराकार रूप
सगुण हा भाव
देवा तुझा ठाव
आहे चित्ती...:६:
© *शशी त्रिभुवन,अस्तगाव(अहमदनगर)*
[30/03, 10:49 am] शशी त्रिभुवन: ☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
*तुझ्या प्रीतीचं अलगुज,*
*जपून आहे हृदयात*
*जुळते मधुर मंगलगाणे*
*तुझ्यामुळेच तयात!*
*©शशी त्रिभुवन,अस्तगाव*
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
[30/03, 3:05 pm] शशी त्रिभुवन: ★★★★★★★★★★★★★★★★
*शांत पाहुडलाय वारा*
*झाडाच्या कुशीत,*
*बोलपाखरे निपचित*
*नाही कुणी खुशीत*
*©शशी त्रिभुवन,अस्तगाव*
★★★★★★★★★★★★★★★★
[30/03, 3:25 pm] शशी त्रिभुवन: शब्दांचे मोती
चारोळीत येता
आशयाला छान
येईल महत्ता
फुलवू काव्य
मोत्याने खास
सरस्वतीचे
आम्ही दास
:
:
:
:
आभार!🙏