Saturday, May 2, 2020

Date: 1 May 2020

➖➖➖➖➖➖➖➖➖
*_हुंदका फितूर..!_*
➖〰️〰️〰️〰️〰️〰️〰️➖
रुतला कंठात
हुंदका फितूर
गाण्याचा गं नूर
पालटला..!

सोनेरी मुलामा
गेलेला फाटून
पंखांना छाटून
उडू नये..!

उध्वस्ताचे सूर
धरुनिया फेर
आक्रसती घेर
आयुष्याचा..!

गाऊ नये गाणे
तुटताना तारा
सुटतो निवारा
पाखराचा..!

तरी का स्फुरावे
काळजाला सूर
आणि डोळा पूर
तुझ्या सये..?
*©शशी त्रिभुवन, अस्तगाव(अहमदनगर)*
*चलभाष:8275032897*
➖〰️〰️〰️〰️〰️〰️〰️➖


No comments:

Post a Comment