Date: 30 Apr 2020
➖➖➖➖➖➖➖➖➖
*सांजेचा पहारा..!*
➖〰️〰️〰️〰️〰️〰️〰️➖
नको सांजेचा पहारा
नको कातर हा जीव
तुझ्या भेटीच्या ओढीने
देही थरार-जाणीव..!
सांग कुठल्या युगाची
नोंद जागवते सांज..
भीती घालून जगाची
मला रागावते सांज!
येते विळखा घालून
तिचा काळा नागफना
सांज कुंपण घालून
जोजाविते काळ्या घना!
अशा सांजेच्या हातून
राया सुटणं कठीण..,
देह हाती देऊ कसा
राया लुटणं कठीण!
सांज अलिप्त होऊन
सांडी जुईचा दर्वळ..,
तुला भेटून लागू दे
तुझ्या मनाचाही तळ!
चळ भरल्या जिवाला
सांज देई ना हवाला..
होवो जीवशिव एक
पार करू या भवाला!
*©शशी त्रिभुवन, अस्तगाव(अहमदनगर)*
*चलभाष:8275032897*
➖〰️〰️〰️〰️〰️〰️〰️➖
➖➖➖➖➖➖➖➖➖
*सांजेचा पहारा..!*
➖〰️〰️〰️〰️〰️〰️〰️➖
नको सांजेचा पहारा
नको कातर हा जीव
तुझ्या भेटीच्या ओढीने
देही थरार-जाणीव..!
सांग कुठल्या युगाची
नोंद जागवते सांज..
भीती घालून जगाची
मला रागावते सांज!
येते विळखा घालून
तिचा काळा नागफना
सांज कुंपण घालून
जोजाविते काळ्या घना!
अशा सांजेच्या हातून
राया सुटणं कठीण..,
देह हाती देऊ कसा
राया लुटणं कठीण!
सांज अलिप्त होऊन
सांडी जुईचा दर्वळ..,
तुला भेटून लागू दे
तुझ्या मनाचाही तळ!
चळ भरल्या जिवाला
सांज देई ना हवाला..
होवो जीवशिव एक
पार करू या भवाला!
*©शशी त्रिभुवन, अस्तगाव(अहमदनगर)*
*चलभाष:8275032897*
➖〰️〰️〰️〰️〰️〰️〰️➖
No comments:
Post a Comment